
जेव्हा असतो पाठीशी आधार बापाचा,
तेव्हा आपणच असतो राजा आपल्या जगाचा........
माझ्या आयुष्याचं सोनं करून स्वतः माती होणारे ,माझ्या आयुष्यातील महत्वाचं पात्र न म्हणता मी त्यांना माझ्या आयुष्यातील सर्वस्व म्हणतो, ज्यांच्यामुळे मी आज अस्तित्वात आहे,जी वक्ती माझ्यासाठी नारळाप्रमाणे म्हणजे बाहेरून कठोर आणि आतून कोमल,गोड आहे. संपूर्ण ब्रम्हांडात ती एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा.
माझ्या बाबांच नाव सोमनाथ मोरे. माझ्या बाबांच शिक्षण F.Y.Bsc पर्यंत, त्यावेळी केवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्याने बाबांचं शिक्षण अधुरं राहिलं. आज माझे बाबा उत्कृष्ट शेतकरी आहेत. माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधी येऊ नये म्हणून माझे आई-बाबा माझ्या शिक्षणासाठी पैशांचा कधी विचार करत नाही. मग भलेही स्वतःच्या पोटाचा कधी विचार करणार नाही.
तुमचे कष्ट आणि मेहनत येईल फळाला,
तुमचा विश्वास आणि हेतू आता कळाला...
माझे बाबा म्हणजे माझं सुरक्षा कवच आहे. माझ्यावर येणारं प्रत्येक संकट ते झेलतात. माझ्यातील शिस्तीच उगम स्थान म्हणजे माझे बाबा. आपल्यावर वाईट वेळ आल्यावर सारं जग माघार घेतं. पण फक्त बापचं सर्वस्व पणाला लावून सगळ्यात पुढे उभा असतो. जशा नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माझ्या आयुष्याच्या दोन बाजू म्हणजे आई आणि बाबा.
तुमच्या बोलण्याने मला आलाच नाही कधी राग,
दिसुन आला तुमच्या मनातील माझ्यासाठी त्याग.......
बाबांच्या बोलण्याचा राग मला कधी आलाच नाही.कारण त्यांच्या बोलण्याने आज मला खरं-खोटं समजतय. माझा वाईट मार्गावरचा प्रवास चालू असताना जर त्यांनी मला ठणकावलं नसतं तर आज मी सत्यमार्गाचा अवलंब केलाच नसता. त्यांच्या बोलण्यात जर माझं हीत असेल तर मी माझं अहीत का करुन घेऊ?
बाबा करून तुम्ही अन्यायाविरुद्ध संघर्ष,
नयनी ठेवतो मी तुमचा आदर्श.....
बाबा तुम्ही माझ्या जीवनातील सर्वस्व आहात. ज्याप्रमाणे तुम्ही मला जपलं. त्याचप्रमाणे मी आयुष्यभर तुमची सेवा करणार आहे. म्हातारपणची काठी अगदी त्याचप्रमाणे मी वागणार. तुम्ही दिलेल्या संस्कारांना मी कधीही तडे पडू देणार नाही. जगातला सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमचा मुलगा होऊन जगण्यात.
सोसून दुःख माझ्यासाठी,
करुन परिपूर्ण संस्कारांनी.
बनुन माझ्या आयुष्याचं पुस्तक,
बाबा तुमच्या चरणी मी होतो नतमस्तक..
- रोहन मोरे