काय करावं, काय नाही

युवा विवेक    14-Feb-2025
Total Views |

 
काय करावं काय नाही

 
काय करावं? हे करू की नये?

काय दुर्दैव! एवढंही कळू नये?

अगं तुझं आयुष्य ना? मग एवढं कसं कळत नाही?

खरंच कळत नाही की कळतंय पण वळत नाही?

रोज रोज फटके खाऊन पुन्हा तेच द्वंद्व उरतं

शत्रू नाही कोणी तरी रोज रोज युद्ध घडतं

"तुझी इच्छा, तुझा अनुभव, तुझी आवड,‌ तुझी निवड.."

सगळे सांगतात, "सोप्पंय डोळे बंद करून निवड!"

अरे? असं कसं सगळ्यांनाच माझी आवड माहिती आहे

एवढी वर्ष जगून सुद्धा मीच मला परकी आहे?

काय चूक, काय बरोबर काही सुद्धा कळत नाही

काय करावं काय नाही एवढं सुद्धा कळत नाही!

 

~ मृण्मयी गालफाडे