माझ्या मनाला माझ्या मनाची
ओळख करून देणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत शिकवण देणारा ॥1॥
ठणकावून सांगणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत मातृत्व देणारा ॥2॥
स्वतः वर ओढून घेणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत जीव देणारा ॥3॥
वाट माझी आडवणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत लगाम लावणारा॥4॥
पाठीशी खंबीर उभा राहणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत साथ देणारा॥5॥
निर्मळ मनाने माफ करणारा।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत सुगंध देणारा॥6॥
ध्येयात साथीदार होणारा।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत सोबत चालणारा॥7॥
मला हिम्मतीने सावरणारा।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत प्रेम करणारा॥8॥
लालची न होणारा ।
जीवनात एक मित्र हवा
मैत्रीत इमान राखणारा॥9॥
माझ्या चारित्र्याचा सारांश सांगणारा।
जीवनात एक मित्र
मैत्रीत आपुलकी जपणारा॥10॥
मी ही तूझा मित्र आनंद देणारा।
जीवनात एक मित्र
मैत्रीत विश्व शोधणारा ॥11॥