सामान्यांतील असामान्य..!

युवा विवेक    23-Dec-2024
Total Views |


सामान्यांतील असामान्य..!

 

लोकांचा जन्म हा मुळातच काहीतरी असामान्य करण्याकरताच झालेला असतो. मग ते क्षेत्र अगदी शैक्षणिक असो वा अंतराळातील झेप! अशीच भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेली घटना म्हणजे तब्बल ११ वर्षांनी भारत बुद्धिबळाचा जगजेत्ता ठरला.

 

डी गुकेश ह्या १८ वर्षीय भारतीय मुलाने डीन लेरेन ह्याचा पराभव करीत सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता बनण्याची किमया केली.

 

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गुकेशने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. विश्वनाथन आनंद ह्यांच्या शहरातील असणाऱ्या गुकेशच्या खेळाची सुरुवात शाळेतच झाली. त्याचे पहिले गुरू भास्करांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांत fide चे रेटिंग मिळवले. त्यानंतरच्या दोन वर्षांनी आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये candidate मास्टर ही पदवी मिळवली. २०१८ मध्ये झालेल्या युवा आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल पाच सुवर्णपदके जिंकून पराक्रम गाजविला. क्लासिकल, रॅपिड आणि ब्लित्झ ह्या तीनही प्रकारात उत्तम कामगिरी असलेल्या गुकेश २०१९ मध्ये तिसरा नोर्म मिळवत जगातील दुसरा सर्वात युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला.

 

२०२२ मध्ये झालेल्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक कांस्य पदक जिंकले. २०२३ मध्ये भारताचा सर्वाधिक रेटिंग असलेला खेळाडू बनत आनंदचा ३७ वर्षांचा विक्रम देखील त्याने मोडीत काढला.

 

२०२४ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियामध्ये दोन्हीं प्रकारात सुवर्ण पदक पटकावून इतिहास घडविला. मॅग्नस कार्लसन, गेरी कास्पोरोव, डिंग, प्राग, अश्या अनेक मातब्बर बुद्धिबळपटुसोबत खेळण्याची किमया कमी वयात साध्य केलेल्या गुकेशला आशिया बुद्धिबळ महासंघाचा सर्वोत्तम खेळाडू सारखे अनेक नामांकित पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. २७०० इतके रेटिंगचा टप्पा पार करणारा गुकेशचा सध्या जगात ५ वा क्रमांक असणाऱ्या गुकेशला तिन्ही प्रकारात सर्वोत्तम बनायचे आहे.
 
 
- दिव्या मावजेकर