वर्षाचा गुणाकार शून्यचं.

युवा विवेक    12-Nov-2024
Total Views |


वर्षाचा गुणाकार शून्यचं.

 

तुला बारा हजारांनी

गुणलं तरी सहासात

वर्षाचा गुणाकार शून्यचं.

या नेमाडेंच्या चारोळी आयुष्यात काहीच न कमवणाऱ्या माणसाचा मापात समाचार घेतात. पहिल्यांदा एका व्याख्यानात या चारोळी मी ऐकलया आणि त्या विनोदाच्या दृष्टीने मला आवडल्या आणि ध्यानातही राहिल्या. पण त्यांची खरी गंमत काही काळातच कळाली.

आयुष्यात माणसाने कमवून तरी काय कमवावे? माझ्या मते तरी आजवरच्या कष्टाचं, मिळकतीच समाधान कमवावं. म्हणजे अगदीच आजवर किंवा आयुष्यात काहीच कमवता आलं नाही अस तरी नको. यशप्राप्ती किंवा अपयश, त्यासाठीची धडपड अश्या किती तरी व्याख्यानातून, समाजातून शून्य गुणाकर असलेली उदाहरण मिळाली. त्यातही त्याांनी शून्य कसा गाठला याच्याही कथा कानी आल्यातच.

तेव्हा शून्य कमवणारी माणसे किती वेगळी असतात. काही न करता, काही तरी करून किंवा काहीतरी उगीचच करून ही माणसे शून्य कमवतात. यातली त्याची धडपड मात्र त्यांनाच ठाऊक. हा झाला सांसारातील, व्यवहारातील शून्य. जो कुणालाही नकोच असतो पण दुर्दैवाने आलाच तर मात्र घ्यावा लागतोच. याउलट एक दुसरही शून्य आहे तो म्हणजे परमार्थातला शून्य. हा शून्य प्रत्येक साधकाला, परमार्थिकाला हवाच असतो आणि तो कमवण्यासाठी ती सतत धडपडतं असतात. शाांता शेळके याच्या रंगरेषा या पुस्तकात त्यांनी या शून्याचा अर्थ उलगडून सांगितला आहे. एक हिंदी ओळही आहे अश्याच आशयाची

सारी चतुराई बिक जाती है बस एक शून्य कमाने मे l

बहुतेक हाच शून्य असावा तो ज्यासाठी माणसाला लबाडपणा, स्वार्थ इत्यादी अवगुण सोडून निष्कपट, निस्वार्थ व्हावं लागेल. ज्यामुळे त्याला शून्य कमवता येईल.

त्याच लेखात एका दुसऱ्या लेखातील विनोदही होता ज्यात लहान शून्य आणि मोठी शून्य सांगितली होती . जर लहान संख्येतून तीच लहान संख्या वजा केली येणार शून्यहि लहानच आणण याउलट एखाद्या मोठ्या संख्येतून तीच संख्या वजा केली तर येणारा शून्य मोठा! त्या लेखात हे वाचल्यावर मला कळालं की साध्या गोष्टीतून सुद्धा किती नावीन्य शोधता येता. वयाचां बांधन नसणारी ही ननरागसता पाहून होणारा आनांद वेगळाच . गणणतात सांख्याांवर आपण दोन साईन प्लस आणण माईनस . पण त्यातही शून्य अश्या हठकाणी आहे की त्याला कुठलांच साईन नाही . शून्याच्या डावीकडे असणाऱ्या सांख्या माईनस आणण उजवीकडील सांख्या प्लस . पण यात शून्यानी साधला सुवणामध्य. तसाच सांसारातही साधायचा असतो . सुखां आणण दुःुख याच्या मधला . शून्याच आणखी एक महत्त्वच काम म्हणजे एकटा असला की तो शून्यच पण कोणत्याही अांकाांसोबत जोडला की तो थेट दहाच्या पटीनेच वाढणार. ककांमत नसणाऱा एकटा शून्य जेव्हा इतर अांकाच्या मध्येयेतो तेव्हा त्याच शून्याांच महत्त्व ककती वाढत ! लाख ककांवा त्यापेक्षा मोठा आकडे जेव्हा चेक बकु वर उतरवायची असतात तेव्हा भली भली मांडळी शून्य ककती झाली हे मोजतात . समाजातही बरीच मांडळी ही शून्यासारखी असतात तर काही अश्या शून्याच्या शोधात असतात . शून्यासारखी मांडळी सगळयाांच्या फायद्याची असते पण स्वतांत्र नतला फार ककांमत नसते . एखादा योग्य व्यक्ती याांचा उपयोग करून स्वतुः उन्नत होतोच आणण त्याचाही ववकास करतोच; पण याची शम्भर टक्के खात्री नाही . उलट आकडयाांसारखी मांडळी मात्र अश्या मांडळीांच्या शोधात असतात जे त्याांच्या फायद्याचे असतील.