स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव आणि डायबेटीस यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? डायबेटीसच्या रुग्णांनी कधी असा अनुभव घेतला आहे का, की एखाद्या गोष्टीमुळे मानसिक तणाव आल्यावर शुगर वाढली आहे? किंवा टेस्टच्या आदल्या रात्री काहीतरी स्ट्रेस असल्यामुळे (किंवा टेस्टच्या स्ट्रेसमुळे) झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी टेस्टमध्ये शुगरचे प्रमाण वाढले आहे?
कधी न कधी हा अनुभव प्रत्येक क्रोनीक डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीला आलेलाच असेल. काय संबंध आहे मानसिक तणावाचा डायबेटीस शी? इथून पुढे जे वाचाल ते बऱ्यापैकी सायंटिफिक आहे परंतु तरीही माझ्या परीने सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करते. इमॅजिन करा की तुम्ही दिवसभराच्या कामाने अतिशय थकलेले आहात. दिवसभर तुम्ही खूप प्रवास केला आहे, आणि आता थकून घरी परतण्यासाठी रस्त्याने चालत येत आहात. खूप कष्टाने पावले टाकत आहात. अंगात अजिबात त्राण नसल्याप्रमाणे अगदी धीम्या गतीने चालत आहात. आणि अचानक समोर मोठा ट्रक आला, अगदी भरधाव! काय होईल? तुमच्या अंगात त्राण नाही तर ट्रकखाली येऊन मरणे पसंत कराल की जी काही शक्ती उरली आहे ती एकवटून त्या ट्रक समोरून बाजूला व्हाल?
याला शरीराची fight or flight mechanism म्हणतात. जी संकटाच्या समयी बचावासाठी अत्यंत महत्वाची असते. खेळाडूंना सुद्धा खेळा आधी पॉझिटिव्ह स्ट्रेस येतो, ज्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो.
परंतु काही कारणाने जेव्हा शरीर सतत मानसिक तणावाखाली राहते तेव्हा हेच कॉर्टिसोल शरीराला बाधक ठरते. कारण, क्रोनीक स्ट्रेसमुळे शरीरात cortisol चे प्रमाण वाढत राहते आणि सतत इंस्युलीन ब्लॉक होत राहिल्या कारणाने रक्तातले साखरेचे प्रमाण सुद्धा वाढत राहते. हे असे होत राहिले तर pancreas च्या कार्यात अडथळा निर्माण होऊन इंस्युलीन योग्य प्रमाणात बनत नाही, आणि टाईप 2 डायबेटीस उद्भवू शकतो. ज्यांना आधीच डायबेटीस आहे त्याचा आजार क्रोनीक स्ट्रेसमुळे वाढू शकतो.
म्हणूनच डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी मानसिक तणाव दूर करण्यासाठी नियमितपणे व्यायाम, योगा, मेडिटेशन हे उपाय करत राहायला हवे. व्यायामामुळे मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते आणि सर्व इंद्रियांचे कार्य सुद्धा सुधारते. मी डायबेटीस रुग्णांना डाएट देताना व्यायामावर कायम भर देते. एक आरोग्यदायी जीवनशैली डायबेटीसचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत करते हे माझ्या काही क्लाएंट्स नी सिद्ध केले आहे.
आशा आहे की आजचा विषय सर्वांना आवडला असेल. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. Till then stay healthy be happy
दीप्ती काबाडे
आहारतज्ञ