झाड..!

04 Aug 2023 13:09:13

झाड..!

झाड उभे एक जागी

पानं, फळं, फुलं देण्या

उभे नित्य निरंतर

ऊन-पाऊस झेलण्या

जयांना हवे फळ

ते दगड मारती

झाड उभे निरंतर

सारे निमूट सोसती

ज्या धरेवर उभे

खत तिस देती

पांग कधी ते कोणाचे

माथ्यावरी न ठेवती

घर सुटता यात्रेत

जन आश्रयास येती

सावकारी ते सुटता

आधार तयाचाच घेती

पाणी बाल्याचे स्मरुन

प्रेमे आडवी जलद

प्राणवायू तो देऊन

नीत ठरते वरद

घर कोसळते कधी

कधी पाण्याने भरते

परि अशा झाडासाठी

छत आभाळ असते

- अनीश जोशी

Powered By Sangraha 9.0