कार्यकारी निर्माता (Executive Producer) -
१. अॅग्रीमेंट्स-
कलाकार, इतर तंत्रज्ञ आणि चित्रपटासाठी उपयोगी प्रत्येक डोमेनचं आणि निर्माता किंवा प्रोडक्शन हाउस यांच्यात अॅग्रीमेंट होणं गरजेचं आहे. आपण नेमकं कोणतं काम करणार आहोत, किती दिवस करणार आहोत, त्याचा आपल्याला कसा आणि किती मोबदला मिळणार आहे, हे सगळं काही त्या अॅग्रीमेंटमध्ये नमूद केलेलं असतं. त्यावर सही करणाऱ्यांना त्यात नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे काम करावं लागतं. ही अॅग्रीमेंट्स पूर्णपणे कायदेशीर असतात. दोन्ही बाजूंनी यात कूचराई झाल्यास कायदेशीर नुकसानभरपाई देण्यास दोन्ही बाजू बांधील असतात. गरजेच्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेचे अॅग्रीमेंट करून घेण्याची जबाबदारी कार्यकारी निर्मात्याची असते. त्यासाठी त्यांचे कायदेशीर सल्लागार देखील परिपक्व हवेत. दोन्ही बाजूनी ठरलेल्या नियम व अटी आणि चित्रपट महामंडळाच्या नियमावलीनुसारच या अॅग्रीमेंट्स बनवल्या जातात. याचे Violation करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
अॅग्रीमेंट्समध्ये असलेल्या काही जुजबी तरतुदी
· तारखांसकट शुटिंगचे दिवस आणि वेळ.
· ठरलेली रक्कम आणि ती कशी द्यायची/ दिली आहे याचे तपशील.
· शूटिंगची ठरलेली ठिकाणं.
२. पेमेंट स्ट्रक्चर -
प्रत्येक कलाकाराचे ठरलेले मानधन हे चित्रपट महामंडळाच्या ठरलेल्या न्यूनतम मानधनापेक्षा कमी नसावं. चित्रपट महामंडळ दर वर्षी प्रत्येक डोमेनचं मानधन ठरवत असतं. त्यास अनुसरूनच ते द्यावं आणि घ्यावं. त्याचा पूर्ण तपशील अॅग्रीमेंटमध्ये असतो. कलाकार आणि निर्माता अथवा निर्मिती संस्था दोघांना पटेल अशी तडजोड कार्यकारी निर्मात्याला जमली पाहिजे.
३. अकोमोडेशन - कलाकार आणि तंत्रज्ञ यांना शूटिंगच्या दरम्यान राहण्याची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था करण्याची जवाबदारी कार्यकारी निर्माता आणि त्यांच्या टीमची असते. यात कार्यकारी निर्मात्यासोबत १. प्रोडक्शन मॅनेजर (निर्मिती व्यवस्थापक, २. प्रोडक्शन कंट्रोलर (निर्मिती नियंत्रक ) आणि इतर लोकही असतात. नेहमीचे हॉटेल्स, केटरर्स, बोर्डिंग्स तर असतातच, त्याचसोबत एखाद्या नवीन ठिकाणी जर चित्रीकरण असेल, तर त्याची नव्याने व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते.
४. ट्रॅव्हलिंग- शुटींगसाठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या येण्या-जाण्याचा खर्च ठरल्याप्रमाणे असतो. निर्मिती खर्चाने येणाऱ्या लोकांच्या ट्रॅव्हलिंगची व्यवस्था कार्यकारी निर्माता आणि त्यांची टीम करत असते.
५. इक्विपमेंट्स-
इक्विपमेंट्समध्ये खालील गोष्टी येतात
१. कॅमेरा आणि लेन्सेस
२. प्रकाशयोजना आणि त्याच्याशी निगडित वस्तू.
३. कॅमेरासाठी लागणाऱ्या ट्रॉलीज, क्रेन्स, ट्रॅक्स.
५. सेटवर बसण्याची / आरामाची व्यवस्था.
६. वॅनिटी वॅन्स.
७. जनरेटर्स आणि त्याच इंधन.
८. अॅम्ब्युलन्स.
या सगळ्याची व्यवस्था आणि यांच्या खर्चाचे नियंत्रण कार्यकारी निर्मात्यावर असतं. यासाठी त्यांची संपर्क यंत्रणा अद्ययावत लागते. अतिशय दुर्गम भागात हे सगळं सुरक्षित पोहोचवण्याची आणि परत न्यायची जबाबदारी मोठी जोखमीची असते.
कलाकार आणि तंत्रज्ञ यांची सुरक्षा एक महत्त्वाचा विषय आहे. चित्रपटविश्वाची क्रेझ लक्षात घेता शूटिंगच्या वेळी मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. शूटिंग सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलीस परवानगी घेणं गरजेचं असतं. सोबतच ज्या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे, त्या मालकाची किंवा संस्थेची लेखी परवानगी घेणं सुद्धा गरजेचं असतं. गरज असल्यास पोलीस संरक्षण देखील मिळू शकतं. परवानगी, संरक्षण हे सगळं कागदोपत्री आणि कायदेशीर अधिकृत असल्याने सहसा कुठली अडचण येत नाहीच. हे सगळं शूटिंग सुरू होण्याआधी पूर्ण झालं पाहिजे. त्याच्या प्रति जवळ ठेवणं बंधनकारक असतं. याची पूर्ण व्यवस्था कार्यकारी निर्माता करत असतो.
...
७. केटरर्स.
बऱ्याच निर्मितीसंस्थांचे केटरर्स ठरलेले असतात. फक्त इतर ठिकाणी शूटिंग असल्यास ही व्यवस्था बदलावी लागते. स्थानिक केटरर्सची व्यवस्था करावी लागते. दोन वेळा चहा, दोन वेळा नाश्ता, दोन वेळा जेवण हा ठरलेला फॉंरमॅट असतो.
८. इतर डोमेन्स - यात खालील बाबी येतात.
१. कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा विमा.
२. अग्निशामक
३. तातडीची वैद्यकीय सेवा.
४. स्थानिकांना मॅनेज करणे.
चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते रिलीजपर्यँत बरीच जबाबदारी कार्यकारी निर्मात्यावर असते. चित्रपटाला सेन्सॉंर प्रमाणपत्र मिळाल्यावर जास्तीतजास्त चित्रपटगृह मिळावी यासाठी यांनाच प्रयत्न करावे लागतात. वितरणाचे हक्क जरी यांच्याकडे नसले, तरी निर्मितीसंस्थेला तोटा होऊ नये म्हणून यांना विशेष परिश्रम दर वेळी घ्यावे लागतात. थोडक्यात निर्मितीसंस्थेने खर्च, व्यवस्थापन आणि नियंत्रणाचे सर्वाधिकार कार्यकारी निर्मात्यांकडे दिलेले असतात.
अनुराग