बदल “आहा! किती दिवसांनी दाण्याची चटणी आणि गरम पोळी खाल्ली गं आई! एक तू आहेस, नाहीतर त्या! दाण्याची काय, कसल्याच चटण्या नसतात घरी कधीच!” आईची लाडकी मिनू लाडानं म्हणाली.“अगं, मग अजून एक पोळी करते तुला थांब...” आई पटकन उठायला ..
नातं “आशुतोष.. खूप छान झाली व्हायवा!” नेहा तिच्या हॉस्पिटलसमोरच्या कॅफेचं दार उघडतानाच जोरजोरात ओरडत आत गेली. आपण आत वाट बघत बसलो आहोत, असा मेसेज त्याने अर्धा तासापूर्वीच नेहाला केला होता. ती आत गेली तर, आशुतोष चक्क तिच्या स्वागतासाठी ..
इंटरनेटची नगरी - भाग १ रोज संध्याकाळी ऑफिसमधून निघतानाच मोहिनीच्या मनात रात्रीच्या जेवणाचे विचार गर्दी करायला लागायचे. संध्याकाळी सहा-साडेसहाला घरी पोहोचल्यावर झोपेपर्यंतचा म्हणजे रात्री साडेदहा-अकरापर्यंतचा वेळ खास तिचा असायचा. सकाळी ऑफिसला जायची घाई, उठल्यावर ..
द वीकएंड सिंड्रोम शुक्रवार आला की हल्ली रीटायर्ड मिलिंद गोडबोल्यांना धडकीच भरत असे. गुरुवारी रात्री जेवणं आटोपली की झोपायला जातानाच उद्याच्या विचारानं पोटात मोठा गोळा येत असे. सुनंदा, म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतींना सुद्धा काहीसं असंच होत असे. त्यामुळे गुरुवारी ..
अनुत्तरीत “प्राण्याच्या आयुष्याचं खरं ध्येय हे आपली प्रजाती वाढवणं हा आहे. पण माणसाच्या महात्त्वाकांक्षा त्यापेक्षा वेगळ्या असतात याचा का विसर पडला असावा माझ्या घरच्यांना?” “काय झालं आहे?”“एकविसाव्या मुलाकडून नकार मिळाला ..
रितेपण “आई शप्पथ! काय सुंदर फोटो आहे हा!” “एन्जॉय बडी!” “व्वा! किती जळतेय मी तुझ्यावर! डाएटमुळे काही मनासारखं खाता येत नाहीये!" “हे! आपण भेटल्यावर मला हीच ट्रीट हवीये.” “तुझ्यासारखं मजेत जगता यायला ..
इंटरनेटची नगरी - भाग २ दुसरा दिवस फुलपाखरासारखा अलगद गेला. दिवसभर रात्रीच्या संभाषणाची आठवण मोहिनीला येत होती. आजसुद्धा बोलणं होईल का हा प्रश्न मधूनच तिच्या मनात डोकावत होता. काल रात्री झालेलं बोलणं तिला आवडलं होतं. हे असं काही मेसेजेसनं हुरळून जायचं कॉलेजचं अल्लड ..
सोडवलेला गुंता वातावरणात जाणवण्याइतपत अस्वस्थता होती. दोघीही अगदी गोंधळून गेल्या होत्या. बारा वर्षांनी ही अशी भेट होतेय म्हटल्यावर दुसरं काय होणार होतं? सुरेखाला तर काही सुधरतच नव्हतं. अचानक संध्याकाळी बेल वाजते काय आणि दारात अंजली आपल्या चार वर्षाच्या मुलीला ..
बॅचलर “अगं, ती सगळी मुलं-मुलंच राहतात बरं का.. काहीतरी सहा-सात मुलं आहेत.. अधूनमधून मुली पण येत जात असतात.. विचार कर काम धरण्याआधी.. नंतर नसता ताप होईल डोक्याला…” “काकू तुम्ही ओळखता का त्या मुलांना?” काकूंच्या बोलण्याला ..
मुक्ता मुक्ता खिन्नपणे आरशासमोर बसून होती. राजीव बेडवर बसून त्याचं काही काम आटपत होता. दोघांमध्ये संवाद होण्याची शक्यताच नव्हती. चार दिवस घरातली एकही व्यक्ती मुक्ताशी बोलली नव्हती. घरातली काय, तिच्या आई-बाबांनी आणि भावानंसुद्धा तिच्याशी बोलणं सोडून ..