एक रुपया, दोन गोळ्या
निवडींचा, पाकिटाचा
कधी जीभेचा चोचला
निरागस काका हाक
आणि निरागस मागणी
चिमुकल्या मुठीमध्ये
दडे दुनिया 'अर्थाची'
रोजचेच बालविश्व
काकूंचे ही लाडके
दोन जिव्हाळ्याचे शब्द
नाही त्यांचेही परके
किती शोधले शोधले
चिंच कैरी लिमलेट
महागड्या दुकानात
नाही कसलाच थाट
शाळेबाहेरची शाळा
छोट्याश्या टपरीत
जिथे नांदतो खेळतो
माझ्या बालपणीचा आनंद
- मैत्रेयी सुंकले