संगीत रत्नाकर !

युवा विवेक    18-Feb-2022   
Total Views |

संगीत रत्नाकर !

 
music1

"साहित्यसंगीतकला विहीनः

सा‌‌क्षात्पशुः पृच्छविषाणहीनः |"

 

हे सर्वश्रुत चरण महाकवी भर्तुहरींच्यानीतिशतकातील एका श्लोकाचे आहे. साहित्य, संगीत आणि कला विहीन आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला तो माणूस नसून शेपूट आणि शिंग नसलेला पशू आहे, असे भर्तुहरी म्हणतात. आणि का नसावा? स्थल, काल, वय, लिंग, रूप यांची कुठलीही मर्यादा बाळगता अनादि कालापासून हे तीन त्रिक आपल्या आनंदाचे स्त्रोत आहेत. त्यातल्या त्यात 'संगीता'ने, पर्यायाने ' आवाजाने' आपले संपूर्ण आयुष्य वेढून टाकले आहे. साध्या दोन गोष्टी एकमेकांवर आदळल्या तरी त्यातून ध्वनीनिर्मिती होते. सगळेच ध्वनी काही संगीतोपयोगी नसतात, पण जेव्हा एखादा संगीतकार काही विशिष्ट ध्वनी निवडून त्याचे स्वरांमध्ये रूपांतर करतो, तेव्हा जीव ओवाळून टाकावा असे संगीत तयार होते.

 

संगीतनिर्मिती हा जितका प्रतिभेचा भाग आहे, तितकाच अभ्यासाचा, साधनेचादेखील भाग आहे. आपल्या देशात अनेक पंडितांनी सगळ्या प्रकारच्या नादांचे अध्ययन करून संगीताचे शास्त्र निर्माण केले आहे तेच शास्त्र आज आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या स्वरूपाने नावारूपास आलेले पाहतो आहोत. यामधे पं.शारंगदेव यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रत्येक साधकास पं.शारंगदेव यांचा 'संगीत रत्नाकर' हा ग्रंथ माही असेलच. किंबहुना त्याशिवाय शास्त्रीय संगीताचा अभ्यास अपूर्ण आहे, कारण अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या बहुतांश परिभाषा ह्या याच ग्रंथावर आधारित असतात..

 

शारंगदेव हे तेराव्या शतकातील प्रतिभासंपन्न कलाकार होते. मूळ कश्मिर भागातील शारंगदेवांचे पूर्वज नंतर दक्षिणेत स्थायिक झाले. शारंगदेव यांचे पिता 'शोडल' देवगिरीच्या एका राजाकडे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या कलेला राजाश्रय हा आपसुकच लाभला. त्यांची प्रतिभा आणि सखोल अभ्यासातून, साधनेतून 'संगीत रत्नाकरचा' जन्म झाला. शारंगदेव यांच्याविषयी फार माहिती उपलब्ध नसली तरी रील काही उल्लेख इतिहासात आढळतात.

 

संगीत रत्नाकरमध्ये एकूण सात अध्याय आहेत. गंधर्व महामंडळाच्या अभ्यासक्रमात या गोष्टींचा समावेश आहे. ते पुढीलप्रमाणे :

) स्वराध्याय : नादाची परिभाषा, उत्पत्ती, भेद, . गोष्टींचा यात समावेश आहे.

) राग विवेकाध्याय : यात २६४ रागांचे वर्णन आणि वर्गीकरण केले आहे.

) प्रकिर्णाध्याय : यात गायकांच्या गुण-दोषांचे वर्णन केले आहे.

) प्रबंधाध्याय : यात विविध गायन प्रकारांचे विश्लेषण केले आहे.

) तालाध्याय : या अध्यायात त्या काळातील ताल वाद्यांची माहिती दिली आहे.

) वाद्याध्याय : वाद्य वर्गीकरण दिले आहे.

) नर्तनाध्याय : नृत्यासंबंधी भाष्य केले आहे.

 

अशा प्रकारे सात अध्यायांमध्ये १३ व्या शतकातील त्या आधीच्या संगीताबद्दल आपल्याला माहिती मिळते. तालांबद्दल, रागांबद्दल, अनेक सांगितिक परिभाषेबद्दल तर माहिती मिळतेच, परंतु त्या काळात कुठल्या प्रकारची वाद्ये वाजवली जात होती, कुठले कुठले गायन प्रकार अस्तित्वात होते याची देखील माहिती आपल्याला या ग्रंथाच्या मार्फत मिळते. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २२ श्रृतींचे वर्गीकरण जातीगायनाचे वर्गीकरण होय. आपल्या शास्त्रीय संगीतात श्रुतींना फार महत्त्व आहे. श्रुतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास संगी उपयोगी स्थिर नाद म्हणजे श्रुती होय, की जो आवाज स्पष्ट श्रवण करण्याजोगा असतो. शारंगदेव यांनी वीणेवर बावीस तारा लावून एक प्रयोग केला त्यातून श्रुती वर्गीकरणाची एक नवीन पद्धत त्यांनी सांगितली आहे.

 

शास्त्रीय संगीताच्यासंदर्भात असल्यामुळे काही मर्यादित लोकांनाच याविषयी माहिती आहे. या असामान्य कलाकाराबद्दल इतर वाचकांना माहिती व्हावी याकरीता हा लेखनप्रपंच. बहुत काय लिहिणे ?

- मृण्मयी गालफाडे