सिनेमॅटिक लिबर्टी - अभिव्यक्ती की अवमान?

युवा विवेक    17-Oct-2022
Total Views |

cinematic liberty - abhivyakti ki awamaan
 
 

सिनेमॅटिक लिबर्टी - अभिव्यक्ती की अवमान?

भारतीय जनमानसाला 'सिनेमा' आणि 'क्रिकेट'ह्या दोन गोष्टींचे प्रचंड वेड आहेत्यातच सिनेमातल्या फॅशन, संवाद, प्रसंग ह्यांचा दैनंदिन जीवनावर खूप परिणाम दिसून येतो, त्यामुळे इतिहासाच्या आणि धर्माच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या समाजात सिनेमॅटिक लिबर्टी हि चित्रपट निर्मात्यासाठी एक कसरतच असते.

 

ओम राऊत दिग्दर्शित "आदिपुरुष" सिनेमाच्या टिझरच्या निमित्ताने हे नुकतंच दिसून आले. त्यानिमित्ताने भारतीय सिनेमातील सिनेमॅटिक लिबर्टीचा ह्या लेखाच्या माध्यमातून वेध घेण्याचा एक प्रयत्न करुयात३ मे १९१३ रोजी 'राजा हरिश्चंद्र'च्या रूपाने भारतीय सिनेमाची सुरुवात झाली. त्याकाळी भारतात हा व्यवसाय नवाच होता त्यामुळे या चित्रपटातील कलावंत कुठे काम करायचे ह्यांचं उत्तर देताना 'हरीश्चंद्राच्या फॅक्टरी' असे उत्तर द्यायचे.(तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास आज 'रामगोपाल वर्माकी फॅक्टरी'पर्यत आला आहे.) दादासाहेब फाळके ह्यांनी येशु ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित एक सिनेमा पाहिला होता, तो सिनेमा पाहिल्यानंतर भारतीय देवतांच्या कथासुद्धा अशाच पडद्यावर झळकल्या पाहिजे ह्या ध्यासाने त्यांना पछाडले त्यांनी ते स्वप्न वास्तवात आणलेराजा हरिश्चंद्राची कथा भारतीय जनमानसाला भावणारी होती. हा सिनेमा ज्याकाळात तयार करण्यात आला त्याकाळी राजा रविवर्मा ह्यांनी रेखाटलेली भारतीय देवी-देवतांची तैलचित्रे लोकप्रिय झाली होतीआजही खेड्यापाड्यातील जुन्या घरात तशी चित्रे आढळून येतात. दादासाहेबांनी ह्याच रूढ झालेल्या प्रतिमा चित्रपटाच्या माध्यमातुन लोकप्रिय केल्या. राजा रविवर्मा (मूळ दक्षिण भारतीय असूनही) ह्यांच्यावर मराठी संस्कृतीचा खूप पगडा होता. त्यांनी चित्रे रेखाटताना मॉडेल्स स्वरूपात महाराष्ट्रीय वेशभूषाच डोळ्यासमोर ठेवल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रात दिसून आले. त्यामुळे दादासाहेबांच्या हरिश्चंद्र तारामतीसह इतर सर्व पात्र हे पडद्यावर मराठी वेशभूषेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मूळ कथेतले उत्तर भारतीय राजा - राणी हे अस्सल मराठमोळे वाटतात.

पुढच्या काळात इतर सर्व चित्रपट टिव्ही मालिकांनी ह्याच गोष्टीचा कित्ता गिरविल्याने कथेच्या दृष्टीने विसंगत असले तरी पडद्यावर मराठमोळे देवी देवता दिसू लागलेपरेश मोकाशी दिग्दर्शित 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ह्या सिनेमात देखील एक गंमतीदार प्रसंग आहे. दादासाहेबांचा कॅमेरामनं मित्र एका प्रसंगाच्या चित्रीकरणात त्याना विचारतो की, 'ह्या दृश्यात मागे फणस दिसत आहेत त्या काळात फणस होते का?' त्यावर दादासाहेब म्हणतात 'ते महत्वाचं नाही, कथा महत्वाची!' सिनेमॅटिक लिबर्टीची सुरुवात ही अशा प्रकारे पहिल्याच सिनेमातून झाली. हरिश्चंद्राच्या कथेप्रमाणेच रामायण आणि महाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन आधारस्तंभ आहेत. भारतीय व्यक्ती, शहरे, नद्या, वास्तूंच्या नावातूनदेखील त्यांचे अस्तित्व आजही जिवंत आहे. त्यातील पात्रे त्यांच्या आचरणाचा भारतीय समाजमनावरील परिणाम हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

 

ह्या दोन्ही महाकाव्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय ८० च्या दशकात प्रसारित झालेल्या दोन दूरदर्शन मालिकांच्या निमित्ताने आला होतारामानंद सागर ह्यांची 'रामायण' आणि बी.आर.चोप्रा ह्यांचे 'महाभारत' ह्या मालिकांनी बनविलेले TRP चे विक्रम अपूर्व होते. त्या मालिकांच्या प्रसारणादरम्यान रस्त्यांवर अघोषित संचारबंदी जाणवायची, लहान मुले युद्धाचे अनुकरण करीत असताना जखमी झाल्याच्या बातम्या यायच्या, अंत्यविधी सुद्धा थांबविले जात असे, टीव्ही समोर अगरबत्ती लावून मालिका पाहिली जाईत्या काळात वाहिन्यांचा इतका महापूर नव्हता. डेली सोपं ही कल्पना त्याकाळी नव्हती किबहुना दूरदर्शनच्या सरकारी नियमात एपिसोड्सचे बंधन असल्याने अनेक उपकथा गाळाव्या लागल्या होत्या. इथूनच सिनेमॅटिक लिबर्टीचा वाद सुरू झाला. कारण पुढे अनेकांनी डेली सोपच्या आणि TRP च्या नावाखाली ह्या दोन्ही महाकाव्यांचे मनोवांच्छित चित्रण करत नाहक एपिसोड्सची संख्या वाढवत नेली.

 

मुळात दोन्ही महाकाव्ये हजारो वर्षापूर्वीची असल्याने त्यात अनेक प्रक्षिप्त कथा कालपरत्वे घुसडल्या गेल्या आहेत. ३५० वर्षांपूर्वीच्या शिवचरित्रावरच इथे एकमत होत नाही तेव्हा हजारो वर्षांची कल्पना करणेपण अवघड आहेरामायण- महाभारत सत्य कि केवळ काव्य हा संपणारा वाद आहे त्यामुळे त्या वादात पडता केवळ महाकाव्य जरी समझले तरी तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, उत्तर रामायण, कंब रामायण असे अनेक प्रकारचे रामायण जगभर सागितले जातेतीच कथा महाभारताची ! महाभारताची व्याप्ती तशी रामायणापेक्षा मोठी असल्याने प्रक्षिप्त कथा खूप मोठ्या प्रमाणात आहे.

उदा. महारथी कर्णला अभेद्य कवच-कुंडल लाभले होते तर एखादा भुंगा त्याच्या मांडीतून पोखरत आत जाईल का???

कौरव-पांडव सोन्याचे मुकुट दागिने घालून लढले असतील का??

दुर्योधनाच्या अभेद्य शरीराची कथा मूळ महाभारतात आहे का??

रामायणातील वानर सेना महाभारतीय युद्धात लढताना मालिकेत का दाखवले गेले नाही???

गोंधळ वाढावा असे बरेच प्रश्न आहे.

गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर धृतराष्ट्राची अजून चांगली साथ दिली असती आंधळ्याची काठी बनून राहिली नसती का??

द्रोपदी सारख्या राजकन्येने आपल्या चुलत सासऱ्याच्या संदर्भात 'अंधाचा पुत्रही अंधच' असे दुर्योधनाला म्हटले असेल का???

सिनेमॅटिक लिबर्टीप्रमाणेच असे प्रश्न अनेक उपप्रश्न निर्माण करतात पण त्यासाठी दोन्ही महाकाव्यांच्या मुळाशी जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही.

लोकांना युद्धाचे प्रसंग पहायला आवडतात म्हणून चमत्कारिक शरसंधान दाखविणे किंवा कौरव पांडव सिक्स पॅक मध्ये दाखविणे हे सर्व सिनेमॅटिक लिबर्टीच म्हणता येईल.

आज वाचन संस्कृती खालावत चालली आहे, दृकश्राव्य माध्यमातला इतिहास प्रमाण मानण्याचा प्रघात वाढत चालला आहे, त्यामुळे इतिहास लेखनाचे नियम इतिहास चित्रणाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येणारी पिढी पडद्यावर जे दिसेल ते खरे मानून अर्धवट इतिहासच खरा मानेलं ह्यात शंका नाही.

दोष एकट्या ओम राऊतचा नाहीए अर्वाचीन आणि मध्ययुगीन कथांवर आधारित इतिहासपटांची लाट आली असताना संदर्भासहित इतिहासाचे निकष कादंबऱ्या, टिव्ही मालिका, वेबसीरीज सर्वांनाच लावावे लागतील अन्यथा "जाकी रही भावना जैसी प्रभू मुरत तेन देखी तैसी" म्हणत ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीनुसार दैवतांच चित्रण करण्याच स्वातंत्र्य द्यावे लागेल.

- सौरभ रत्नपारखी