अभिनयातील नवरस..
३. शृंगाररस - रेखा यांचा उत्सव या चित्रपटातील भूमिकेचा काही भाग श्रुंगाररसातील होता.
४. वीररस - एखाद्या साहस दृष्यासाठी महत्वाचा असणारा हा भाव.
५. अद्भुत - सुखाद्भुत किंवा दुखाद्भुत रस ! विस्मय बोधक.
६. रौद्ररस - राग दर्शवणारा भाव.
७. शांतरस - मनातील शांत स्वभाव दर्शवणारा रस.
८. भयरस - भय दाखवणारा किंवा दर्शवणारा रस.
९. बीभत्सरस - बीभत्स दृष्य दर्शवणारा रस.
अभिनय नैसर्गिक असावा. आपण कोणतं पात्र करत आहोत, त्याचा नीट अभ्यास करूनच कॅमेरा समोर जावं. प्रत्येक संवादासोबत चेहऱ्याचे हावभाव आणि कोणत्या शब्दाला किती वजन द्यायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक प्रवेश अगदी सहज हवा.
नाटक आणि सिनेमाच्या अभिनयात खूप फरक आहे. नाटकात अभिनयाची पावती ताबडतोब मिळते. प्रयोगाच्या वेळी चूक झालीच, तर ती सुधारता येत नाही. तसंच नाटकात ऐन वेळी काहीही ॲडिशन करणं किंवा कात्री लावणं अवघड असतं. ऐनवेळी घडून येणारे बदल नवीन लोकांसाठी अवघड असत.
सिनेमात रिटेकची सोय असल्याने अभिनयात विविध प्रयोग करणं सोपं असतं. पूर्वीच्या काळी 'फिल्स्म' असल्याने कित्येक रिटेक्स झाल्यावरच फायनल टेक शूट केला जात असे. त्यामुळे नवीन आणि जुन्या-जाणत्या कलाकारांमध्ये ताळमेळ बसायला उशीर लागायचा. टेक घेताना एखादी मोठी चूक झाली, तर ती फिल्म वाया जात असे. आता कॅमेऱ्याचं आउटपुट डिजिटल फॉरमॅटमध्ये असल्याने दुरुस्तीला वाव मिळतो.
तंत्रज्ञानात झालेल्या upgradation मुळे काही गोष्टी अतिशय सुलभ झाल्या आहेत. विशेषकरून एडिटिंग हा भाग अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असायचा. खूप साऱ्या फिल्म्स एकत्र करून त्यातील परफेक्ट क्लिप निवडून मागील फिल्म्सला जोडायची कामगिरी अत्यंत बिकट होती. त्यामुळेच आधीच्या अभिनेत्यांकडून तालमीतच पूर्ण कामगिरी करून घ्यावी लागत असे. त्यामुळेच की काय, पण आधीच्या आणि आजच्या अभिनयातील हा फरक जाणवतो.
प्रचंड स्पर्धा , ग्लॅमर यात अभिनय कुठेतरी हरवल्यासारखा आहे. वर नमूद केलेल्या नवरसाबद्दल किती नवोदितांना माहीती असेल, शंका आहे. जुन्या पिढीतून आपण घेतलेल्या काही मौल्यवान ठेवींपैकी अभिनयसंपन्नता ही एक आहे. त्याकाळी अभिनयाने अजरामर केलेल्या काही व्यक्तिरेखा आजही जिवंत आहेत.
'प्राण'यांच्या बद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकेकाळी नकारात्मक भूमिका करणारे हे अभिनयसम्राट ! त्यांचा अभिनय, हावभाव, हसणं इतकं जिवंत असायचं की त्याकाळी आई-वडील आपल्या मुलांचं नाव "प्राण"ठेवत नसत. त्याकाळी अभिनेत्याला त्याच्या पात्रावरून ओळखण्याची सवयच होती. आपल्या आवडत्या अभिनेत्याची हेअरस्टाइल , चालायची, बोलायची शैली , इतकंच काय तर सिगरेट ओढायची style देखील प्रचलित होती. "प्रचलित" असल्याची सवय काही वर्षांपूर्वी मोडीस निघाली. स्पर्धा आणि व्यावसायिकता वाढल्याने तुलनात्मक चढाओढ वाढली. परिणामी गुणवत्ता आणि प्रमाण याचा समतोल राखणं अवघड झालं. पूर्वी नसलेल्या सोशल आणि इतर मीडिया असून देखील गर्दीमुळे खरा अभिनय झाकोळला गेला आहे. तरी काही खऱ्या 'टॅलेंट'ने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहेच. कथेत-पटकथेत -संवादात आलेलं नावीन्य आणि कमी झालेले पर्याय देखील अभिनयात असलेली खोली दर्शवताना कमी पडले आहेत.
चित्रपटात असलेला भोळा भाव हरवल्यासारखा वाटत असला तरी काही ठिकाणी अभिनयसंपन्नता बघायला मिळते. नवीन दमाचे दिग्दर्शक , कलावंत यांची सांगड काही चांगले रिझल्ट देऊन जाते आहे. मीडियाने विदेशातील चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवले, तसे आपलेही चित्रपट साता-समुद्रापार पोहीचवले आहेतच.
एक सर्वगुणसंपन्न अभिनेता किंवा अभिनेत्री असणं म्हणजे काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात.
१. भूमिकेची लांबी-रूंदी न बघता त्याची व्याप्ती किती आहे.
२. आपल्याला मिळणारा रोल हा आपल्या स्वभावाशी मिळता-जुळता असला म्हणजे अभिनय नैसर्गिक आणि स्वाभाविक होतो.
३. सुरुवातीला काही काळ मानधनापेक्षा मिळणाऱ्या भूमिकेवर पक्कं रहा. जितक्या जास्त भूमिका मिळतील, तितकी विविधता दाखवण्यास वाव मिळेल.
४. चित्रपट पहाणे, वाचनाने अभिनय आणि भाषा शुद्ध होते. त्याकडे आपला कल असू द्या.
५. ऑडिशन देताना चित्रपट महामंडळाची परवानगी असलेले ऑडिशन्सलाच प्राधान्य द्यावं. जितके जास्त ऑडिशन्स , तितका सराव होईल.
६. आपले सह-कलाकार, सेटवरचे इतर लोक यांच्याशी सलोख्याने वागा. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं.
७. स्वतःचे ॲडिशन्स टाकण्याआधी एकदा कथा-पटकथाकार आणि दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करा.
पुढच्या भागात आपण ऑडिशन्सबद्दल चर्चा करणार आहोत.
- अनुराग वैद्य